मुंबई : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्बंधांचंही पालन नागरिकांकडून होत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागच्या वर्षीसारखा लॉकडाउन लावण्याचा इशारा दिला आहे. त्यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय.
अजित पवार आपण रोज उठून लॉकडाउनची धमकी देता, पण पुण्याचे आपण पालकमंत्री आहात तिथे परिस्थिती सर्वात गंभीर आहे. पुण्यात कोण तुमचं ऐकत नाही आणि धमकी तुम्ही महाराष्ट्राला देता. नेतेगिरी कामात दाखवा साहेब, लोकांचे जीव वाचतील. लॉकडाउन हा फक्त एक पर्याय आहे, उपाय नाही, असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.
तुम्ही हे वाचलात का?
“केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण”
दरम्यान, अजित पवार यांनी शुक्रवारी शहर आणि जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर अजित पवार यांनी वीकेंड लॉकडाउनबद्दल भाष्य केलं होतं. लोकांनी दोन दिवसांचा लॉकडाउन पाळला नाही, तर मागच्या वर्षीसारखा लॉकडाउन आणावा लागेल, असं मंत्रिमंडळातील सहकारी म्हणत असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं होतं.
अजित पवार आपण रोज उठून लॉकडाऊनची धमकी देता पण पुण्याचे आपण पालकमंत्री आहात तिथे परिस्थिती सर्वात गंभीर आहे, पुण्यात कोण तुमचं ऐकत नाही आणि धमकी तुम्ही महाराष्ट्राला देता. नेतेगिरी कामात दाखवा साहेब, लोकांचे जीव वाचतील, लॉकडाऊन हा फक्त एक पर्याय आहे, उपाय नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 16, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“शिवाजी द बाॅस फेम अभिनेते विवेक यांचं निधन”
“फडणवीसांकडून अपेक्षाच नाही, भेटीसाठी साडेचार वर्ष थांबलेलो”
धोनीसेनेचा विजयारंभ! चेन्नईचा पंजाबवर 6 गडी राखून दणदणीत विजय