मुंबई : प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली असून, त्याचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असं म्हटलं आहे. यावर भाजप नेते राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली. राम कदम यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून शिवसेना आणि जावेद अख्तर यांच्यावर टीका केली आहे.
संघाची तुलना तालिबान सोबत करणं चुकीचं असल्याचे शिवसेनेनं हे स्वीकारलं आहे. जावेद अख्तर यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयीचे विधान चुकीचं आहे. आम्ही त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. पण अद्याप त्यांच्यावर कारवाई झालेली नाही, असं राम कदम म्हणाले.
शिवसेना त्यांच्यावर कारवाई का करीत नाही. त्यांना अटक करण्यापासून शिवसेनेला कोणी रोखलं आहे. याचं उत्तर सत्तेत बसलेल्या शिवसेनेला आणि महाविकास आघाडी सरकारला द्यावं लागेल. जावेद अख्तर यांना माफी मागावी लागेल., असं राम कदम यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, जावेद अख्तर यांनी भारतातील व्यवहार पाहिला आहे. त्यांनी तालिबान येथील व्यवहार पाहिलेला नाही. एकदा त्यांनी तेथे जावं. तेथील तालिबानी व्यवहार पाहावा, मग त्यांना आपोआप सद्बुध्दी सुचेल. त्यांनी हात जोडून माफी मागितली पाहिजे, अशी मागणी राम कदम यांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! करूणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; बीड जिल्हा कारागृहात होणार रवानगी
बेळगावमध्ये भाजपने रचला इतिहास; महापालिकेवर भाजपचा झेंडा
करुणा शर्मा गाडीत पिस्तुल ठेवल्याचा व्हिडिओ! देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
“भाजपला धक्का! भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ‘या’ आमदाराची शिवसेनेत होणार घरवापसी?”