Home महाराष्ट्र हे सरकार नक्की चालवतंय कोण?; भाजपचा शिवसेनेला सवाल

हे सरकार नक्की चालवतंय कोण?; भाजपचा शिवसेनेला सवाल

मुंबई : राष्ट्रवादीचे मंत्री मुख्यमंत्र्यांना न विचारता निर्णय घोषित करतात का? नक्की हे सरकार चालवतंय कोण? असा सवाल करत भाजपने मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

मुस्लिम आरक्षण विषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा युटर्न चारदिवसांपूर्वीच सामनामधील आलेली बातमी आणि आजची बातमी याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेने असा घ्यायचा का राष्ट्रवादीचे मंत्री मुख्यमंत्र्यांना न विचारता निर्णय घोषीत करतात का ? नक्की हे सरकार चालवतय कोण?, असं ट्विट भाजपने केलं आहे.

मुस्लिम समाजाला शिक्षणात 5 टक्के आरक्षण देणार असल्याची घोषणा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेत केली होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत काही निर्णय झाला नसल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, मुस्लिम आरक्षणाचा प्रस्तावच आपल्याकडे आला नाही. जो मुद्दा आमच्यासमोर आलेला नाही त्यावरुन आदळआपट करण्याची गरज नाही. ज्यावेळी मुद्दा समोर येईल, त्यावेळी सर्व बाजू तपासून घेतल्या जातील, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.  यावरुन भाजपने शिवसेनेवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“आमच्या घरात माझ्यापेक्षा माझ्या बायकोला पगार जास्त आहे”

…तर आम्ही शिवसेनेला पाठिंबा देऊ- सुधीर मुनगंटीवार

जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मोदी आहेत; रामदास आठवलेंच वक्तव्य

मी मोदींच्या मार्गाचा अवलंब करेन; त्यांनी सोशल मीडिया सोडलं तर मीही सोडेन