कोण होतास तू… काय झालास तू…अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू; फडणवीसांची संजय राऊतांवर टीका

0
464

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राऊत यांची अवस्था कोण होतास तू…काय झालास तू…अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू…अशी झाली आहे, अस म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेना खासदार संजय राऊत यांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला.

8 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी एक ट्वीट केले. त्यात त्रिपुरात खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिमांवर अत्याचार सुरू असल्याचा उल्लेख होता. त्यानंतर लगेच दोन दिवसांमध्ये 11 नोव्हेंबर रोजी मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये मोर्चे निघाले. कुणाच्या ध्यानीमनी नसता इतके मोठे मोर्चे कसे काय निघतात? नियोजनाशिवाय हे मोर्चे निघणे शक्यच नाही. नियोजन झाले असेल तर सरकार, आयबी, गुप्तचर, पोलिसांनी कसे काय माहित नाही, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.

हे ही वाचा : महाविकास आघाडी सरकार काळे झेंडे दाखवण्याच्या लायकीचे; गापीचंद पडळकरांचा हल्लाबोल

सरकारच्या समर्थनाने हे मोर्चे निघाले. हा पद्धशीरपणे पोलरयाझेशनचा प्रयोग आहे. या मोर्चामध्ये निवडून हिंदूंची दुकाने जाळली गेली. दुकान कुणाचेही जाळणे ते चुकीचेच. मात्र, या साऱ्या हिंसाचारावर महाविकास आघाडींच्या नेत्यांची तोंडे शिवली गेली. त्यात संजय राऊतांची अवस्था कोण होतास तू… काय झालास तू…अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू…अशी झाली आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

‘शिवाज्ञा’ राज ठाकरेंनी व्यंग्यचित्रातून अर्पण केली बाबासाहेब पुरंदरेंना आदरांजली

विक्रम गोखलेंच्या ‘त्या’ वक्त्यावर अभिनेत्री स्वरा भास्करची प्रतिक्रिया, म्हणाली…

रुग्णालयात पेशंटला भगव्याचं रक्त असेल तरच देणार का?; अमोल कोल्हेंचा विक्रम गोखलेंना सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here