Home महाराष्ट्र “पाकिस्तानमध्ये 58 रूपये लीटर पेट्रोल असताना, भारतामध्ये 106 रूपये का?”

“पाकिस्तानमध्ये 58 रूपये लीटर पेट्रोल असताना, भारतामध्ये 106 रूपये का?”

मुंबई : गेल्या वर्षीपासून राज्यात कोरोनाचा संकट मोठ्या प्रमाणात आहे. आणि तसेच मे महिन्यापासून पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. मुंबईत पेट्रोलचा भाव आता 106 रूपयांवर पोहचला आहे.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे नागरिक हैरान झाले आहेत. यावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी यावेळी बोलताना केंद्र सरकारवर टीका केली आहे.

शेजारच्या पाकिस्तान, बांगलादेशात पेट्रोल प्रति लीटर 58 रुपये तर नेपाळमध्ये 56 रुपये लीटर आहे. मग भारतात पेट्रोल 106 रुपये लीटर का, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला. तसेच सामान्य माणुस केंद्र सरकारच्या जुलमाला कंटाळली आहे, अशी टीका भाई जगताप यांनी केली.

महत्वाच्या घडामोडी –

“पदभार स्वीकारल्यावर नारायण राणेंचा पहिल्याच दिवशी कामाचा धडाका, अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर”

“संजय राऊतजी, महिलांची तुलना करताना भान ठेवा, अन्यथा आम्हांलाही आरेला कारे करण्याची भाषा येते”

“राफेल चौकशीची आग लागली फ्रान्समध्ये आणि धूर निघाला दिल्लीत, कुछ तो गडबड है…

खडसे प्रकरणात मी काय बोलणार, मी ईडीचा प्रवक्ता नाही; फडणवीसांचं मोठं वक्तव्य