आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पुण्यात मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष रुपाली पाटील- ठोंबरे यांनी आपल्या सर्वपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. रूपाली पाटील यांच्या राजीनाम्यानंतर आता त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार, असा सवाल उपस्थित झाला होता.
हे ही वाचा : माझं वय 25 होईपर्यंत त्यांचं काहीच ठेवत नाही; रोहित आर. आर. पाटलांचा थेट विरोधकांना इशारा
रूपाली पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केल्यानं मनसेला मोठा धक्का बसला. मात्र रूपाली पाटील या राष्ट्रवादीत प्रवेश करताना भावूक झाल्याचं बघायला मिळालं. या संदर्भात रूपाली पाटील यांन ट्विट केलं आहे.
आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‛हात’ नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‛पाय’ दिसत नाहीत ; हो म्हणूनच ठरलंय ! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार …, असं ट्विट करत रूपाली पाटील यांनी आपण राष्ट्रवादीत प्रवेश नक्की झाला निश्चित केलं.
आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‛हात’ नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‛पाय’ दिसत नाहीत ; हो म्हणूनच ठरलंय ! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार …@NCPspeaks @ShivSena@INCIndia
— Rupalipatilthombare (@Rupalispeak) December 16, 2021
महत्वाच्या घडामोडी –
कसला शेंबडा आमदार निवडून देता रे; नारायण राणेंचा शिवसेनेच्या ‘या’ नेत्यावर टीका
चांगल्या माणसांची मनसेला किंमत नाही; जिल्हाध्यक्षांना पदावरून हटवल्यानंतर समर्थक आक्रमक
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वंचित बहुजन आघाडी आक्रमक; विधानभवनावर काढणार मोर्चा