Home जळगाव राजू शेट्टी आमदार होणार की नाही; जयंत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…

राजू शेट्टी आमदार होणार की नाही; जयंत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…

जळगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीबाबत निर्माण झालेल्या गोंधळावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

राज्य सरकारने शिफारस केलेल्या 12 जणांच्या नावांबाबत राज्यपालांनी आता लवकर निर्णय घ्यायला हवा, अशी आमची मागणी आहे. यापूर्वी जी यादी राज्य सरकारने राज्यपालांना सादर केली आहे, त्यातून कोणाचेही नाव वगळलेले नाही., असं जयंत पाटील म्हणाले.

आम्ही पुन्हा एकदा राज्यपालांना या विषयाबाबत विनंती केली आहे. त्यामुळं राजू शेट्टी यांचं नाव वगळण्यात आलं नसल्याचं एकप्रकारे जयंत पाटील यांनी यावेळी म्हटलं. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या नुकसानीच्या पाहणीसाठी जयंत पाटील आज चाळीसगावच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

ज्यांचा मुख्यमंत्री असतो, त्यांचंच सरकार असतं; संजय राऊतांच्या विधानानं खळबळ

“टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा आणखी एक जलवा! बॅडमिंटनमध्ये प्रमोद भगतनं पटकावलं सुवर्णपदक”

जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जाऊन अतिरेक्यांसोबत राहावं- चंद्रशेखर बावनकुळे

भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत नाही; भाजपच्या ‘या’ आमदाराचा पक्षाला घरचा आहेर