“मनसे असो वा राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप त्यांच्याशी युती करणारच नाही”

0
876

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट झाल्यानंतर मनसे-भाजप युती होणार, अशी राज्यात चर्चा सुरू होती. यावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली.

मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव भाजपने दिलं. आता ठाकरे सरकार हस्तांतराचा ठराव मंजूर करून टक्केवारी घेत आहे, असा आरोप आशिष शेलार यांनी यावेळी केला. तसेच मनसे असो वा राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांच्याशी भाजप युती करणार नाही, असं आशिष शेलार यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, राज ठाकरे हे माझे आवडते व्यक्तिमत्व आहे, तसंच लवकरच मी त्यांची भेट घेणार आहे, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होतं. यावर मनसेकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेनेत घेतले नाही म्हणून चित्रा वाघ यांचा जळफळाट”

शरद पवारांचं अमित शहांना पुणे भेटीचं निमंत्रण; पुन्हा चर्चांना उधान

बीड जिल्ह्याचं नाव केलं, लोकनेत्याच्या लेकीनं; पंकजा मुंडेंवर भन्नाट गाणं

ज्यांनी ज्यांनी भाजपला सोडले, त्यांची दुर्गतीच झाली; आशिष शेलारांचा खडसेंना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here