Home महत्वाच्या बातम्या अजित पवारांच्या शब्दाला मंत्रीमंडळात किंमत आहे की नाही?; भाजपचा सवाल

अजित पवारांच्या शब्दाला मंत्रीमंडळात किंमत आहे की नाही?; भाजपचा सवाल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात चर्चा आहे ती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या छाबय्या विहंग गार्डन या इमारतीची! गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आल्यानंतर त्यावरून बराच वाद सुरू झाला आहे.

विरोधकांकडून राज्य सरकारवर यावरून परखड टीका केली जात असताना त्यासंदर्भात सोशल मीडियावर देखील चर्चा पाहायला मिळत आहे. ठाण्यातील छाबय्या विहंग गार्डन या प्रताप सरनाईक यांच्या इमारतीवर ठाणे महापालिकेने लावलेला दंड माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यावरून आता भाजपाने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : “…तर मी धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढेन”

“राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांचा विरोध असताना शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या छाबय्या विहंग गार्डन या इमारतीवरील दंड व त्यावरील व्याज माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. मंत्रिमंडळात अजितदादांच्या शब्दाला किंमत आहे का नाही?” असा सवाल भाजपानं आपल्या महाराष्ट्र ट्विटर हँडलवरून केला आहे.

दरम्यान,  आमदार सरनाईक यांच्या गृहसंकुलाला झालेला दंड व त्यावरील व्याज माफ करण्याबाबत नगरविकास विभागाने वित्त विभागाकडे फाईल पाठवली असता वित्त विभागाने अशी सूट देऊ नये, असा स्पष्ट अभिप्राय दिला होता. सदरचा दंड हा ठाणे महानगरपालिकेच्या आर्थिक स्त्रोताचा एक भाग आहे. विकासकामांसाठी राज्य शासनाकडून महानगरपालिकांना निधी उपलब्ध केला जातो. दंड माफी म्हणजे अप्रत्यक्षपणे राज्य शासनाचा तोटा ठरतो, असं या पत्रात म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“मोठी बातमी! मनसे आमदार राजू पाटील यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण”

“गायब असलेले नितेश राणे अखेर दिसले कॅमेऱ्यात; राणेंना पाहण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी”

मराठी पाठ्यांवर घेण्यात आलेल्या निर्णयाचे खरे श्रेय राज ठाकरेंचं आणि मनसैनिकांचंच; तृप्ती देसाईंकडून स्तुतीसुमने