जिथं सत्ता नाही, तिथं भाजप राज्यपालांच्या माध्यमातून सत्ता राबवतंय- संजय राऊत

0
314

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हिंगोली, परभणी आणि नांदेडमध्ये दौरा आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

ज्या राज्यात भाजपची सरकारे नाहीत, तिथं भाजप राज्यपालांच्या माध्यमातून सत्ता राबवण्याचा प्रयत्न करत आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी यावेळी केला.

दरम्यान, दिल्लीत सध्या काय चाललंय? दिल्लीचे राज्यपाल त्याच पद्धतीने काम करत आहेत. पश्चिम बंगालचे राज्यपालही त्याच पद्धतीने काम करत आहेत आणि महाराष्ट्राचे राज्यपालही त्याच पद्धतीने दुडूदुडू धावताहेत. धावू द्या. काही हरकत नाहीत. दम लागून पडाल तुम्ही, असा टोलाही संजय राऊतांनी यावेळी राज्यपालांना लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“मनसे असो वा राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप त्यांच्याशी युती करणारच नाही”

“शिवसेनेत घेतले नाही म्हणून चित्रा वाघ यांचा जळफळाट”

शरद पवारांचं अमित शहांना पुणे भेटीचं निमंत्रण; पुन्हा चर्चांना उधान

बीड जिल्ह्याचं नाव केलं, लोकनेत्याच्या लेकीनं; पंकजा मुंडेंवर भन्नाट गाणं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here