Home महाराष्ट्र तीन महिन्याचे पैसे माणसाने आणायचे कुठून?; निलेश राणेंचा राज्य सरकारला सवाल

तीन महिन्याचे पैसे माणसाने आणायचे कुठून?; निलेश राणेंचा राज्य सरकारला सवाल

मुंबई :  कोरोनाच्या कठीण काळात घरमालकांनी भाड्यासाठी तगादा लावू नये. यासाठी किमान तीन महिने भाडेकरुंना वेळ द्यावा, अशा सूचना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिल्या आहेत. त्यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

तीन महिन्याने घरभाडे पुढे ढकलले सरकारने पण तीन महिन्यानंतर तीन महिन्याचे पैसे माणसाने आणायचे कुठून??? नुसते पुढे ढकलून चालणार नाही, तीन महिन्याचे भाडे राज्य सरकारने स्वतः भरावे किव्हा माफ करावे, असं निलेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, यासंदर्भात निलेश राणे यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यांनी हे ट्विट करताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सीएमओ महाराष्ट्रला टॅग केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

टाटा ट्रस्ट करणार पुन्हा देशाची मदत; आता देणार ‘इतक्या’ रुपयांचा निधी

“उद्धव ठाकरेंविरुद्ध गुन्हा केव्हा दाखल होणार?; किरीट सोमय्यांचा सवाल”

लॉकडाऊनच्या काळात शालेय शुल्क भरण्याची सक्ती करू नये- वर्षा गायकवाड

राज्यसरकारविरुद्ध पंकजा मुंडे आक्रमक; उद्याच्या उद्या जाहीर करा निर्णय बस्स!!