Home महाराष्ट्र ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?; एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना...

‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?; एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसलं

मुंबई : मुंबईत सोमवारी पहाटेपासून तौक्ते चक्रीवादळाचा मोठा जोर पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. तर अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं देखील दृष्य पाहायला मिळत आहे. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

निलेश राणे यांनी यासंदर्भात ट्विट केला आहे. निलेश राणेंनी वरळीच्या एका भागातील व्हिडिओ शेअर केला आहे. हे चित्र वरळी मतदार संघाचं आहे… वरळीकर विचारतायत तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे??? ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली??? एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसलं, सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही., असा हल्लाबोल निलेश राणेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“केंद्र सरकारने दिलेले व्हेंटिलेटर फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी सुरू करून दाखवावे”

“महाराष्ट्र संकटात असताना अमृता फडणवीसांना शेरोशायरी सुचते, यामधून त्यांना सत्तेची लालसा दिसून येते”

छोटी शहरं आणि गावातील आरोग्य व्यवस्था राम भरोसे; उच्च न्यायालयानं योगी सरकारला सुनावलं

घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा; रुपाली चाकणकरांचा केंद्र सरकारला टोला