कोल्हापूर : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, असं निवडणुकीपूर्वी अजित पवार म्हणाले होते. त्याचं काय झालं?, असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. ते कोल्हापूरातील एका कार्यक्रमात बोलत होते.
सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु असं आश्वासन शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं होतं. मग आता तुमचं सरकार आलं, तरी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा का झाला नाही? असा सवाल करत राजू शेट्टी यांनी सरकारवरही निशाणा साधला आहे.
राज्यात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांचं एकत्रित महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे. या आघाडीत राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाही समावेश आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन शेट्टी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं..
कर्जमाफी करण्यासाठी पैसे नसतील तर तसं सांगून शेतकऱ्यांना विश्वासात घ्या. शिवभोजनाची योजना सरकारने आणली आहे. पण शिवारच मोकळं राहणार असेल तर शिवथाळी आणणार कुठून?, असं म्हणत त्यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
-2020 मधल्या पहिल्याच टी-20 सामन्यावर पावसाचं पाणी; भारत-श्रीलंका सामना रद्द
-“हिंमत असेल तर या तिन्ही पक्षांनी स्वतंत्र लढवून दाखवावं”
-“राज्यातील कोणत्याही आमदाराला पगार न देता शेतकऱ्यांना मदत करा”
-महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारणं म्हणजे द्वेषाचं राजकारण- अमोल कोल्हे