नाशिक : केंद्रातील मोदी सरकारला 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्यभरात ठिकठिकाणी निषेध नोंदवला आहे. काँग्रेस नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाशिक येथे पत्रकार परिषद घेत भाजप व मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
आता पेट्रोलने सेंच्युरी मारली आणि गॅस वाढले आहेत. काँग्रेसच्या काळात महागाईवर आंदोलन करणारे आता कुठं लपून बसले आहेत, असा प्रश्न थोरात यांनी यावेळी केला. तसेच महागाई वाढल्यानं सर्व सामान्यांच्या खिशातील पैसे गेले. मात्र कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या तरी आपल्याकडे वाढ सुरू आहे., असंही थोरातांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, भाजपनं दरवर्षी 2 कोटी तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. तसेच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक भारतीयांच्या खात्यात 15 लाख रुपये टाकण्याचं आश्वासन दिलं होतं. काळा पैसा भारतात आणणार असं म्हटलं होत, मात्र ही आश्वासन पूर्ण झाली नसल्याचा आरोप थोरातांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
…तर बाळासाहेब वरुन थोबाडीत मारतील; चंद्रकांत पाटलांचा टोला
चंद्रकांतदादांना काय बोलावं हे कळत नाही, त्यांना मस्ती आली आहे; हसन मुश्रीफांचा हल्लाबोल
‘या’ सरकारच्या बेफिकीरीमुळेच ओबीसींचं आरक्षण गेलं- चंद्रशेखर बावनकुळे