Home महाराष्ट्र पाकव्याप्त काश्मीर भारताला कधी जोडताय?- संजय राऊत

पाकव्याप्त काश्मीर भारताला कधी जोडताय?- संजय राऊत

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : द काश्मीर फाईल्स सिनेमावरुन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधलाय. मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी भाजपाला धारेवर धरलं आहे.

द काश्मीर फाईल्स या सिनेमाचा ज्वर ओसरत आहे. काश्मीर हा देशासाठी आणि देशातील जनतेसाठी अत्यंत संवेदनशील विषय आहे. आजपासून नाही, फाळणीपासूनच हा संवेदनशील विषय आहे. अनेक वर्षापासून काश्मीरवरून राजकारण सुरू आहे. आम्हाला वाटलं होतं मोदी सरकारण आल्यावर राजकारण थांबेल. पण ते वाढतच चाललं आहे. या चित्रपटात ज्या गोष्टी दाखवल्या त्यावर मी काही बोलणार नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहेत.

हे ही वाचा : MIM ची तुम्हाला प्रस्ताव देण्याची हिंमतच कशी होते?; मनसेचा शिवसेनेला सवाल

या सिनेमात ज्या गोष्टी दाखवल्या आहेत, त्या असत्य आहेत. त्या सत्याला धरून नाहीत असं अनेक लोक म्हणत आहेत. पण तो सिनेमा आहे. ज्याला तो पाहायचा ते पाहतील आणि स्वागत करतील. ज्यांनी पाहिलाय आणि ज्यांना त्यातील ज्या गोष्टी खटकतात त्यावर ते बोलतील. एवढं स्वातंत्र्य या देशात आपल्याला आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमध्ये बेरोजगारी हटवण्यासाठी सर्वात मोठी गुंतवणूक करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याचं काय झालं? पाकव्याप्त काश्मीर हिंदुस्थानात आणून अखंड हिंदुस्थानचं स्वप्न पूर्ण करू अशी घोषणा केली होती. तो पाकव्याप्त काश्मीर कधी जोडताय?, असा सवालही संजय राऊत यांनी भाजपला केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

‘…मग मी हिंदुत्त्वाच्या गप्पा मारतो’; MIMच्या ऑफरवरुन शिवसेनेची फडणवीसांवर टीका

शिवसेनेचं हिंदुत्व ढोंगीपणाचं, त्यामुळे…; भाजपचा हल्लाबोल

तुमच्या निष्काळजीपणामुळे बीड जिल्ह्याची बदनामी; पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर