सावित्रीच्या लेकीसाठी महाराष्ट्र कधी बंद करणार?; पुण्यातील ‘त्या’ घटनेवरून चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

0
401

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : पुण्यात काल 14 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत घटनेचा निषेध केला आहे.

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून महिला अत्याचाराच्या घटना वाढतच चालल्या आहे. महाराष्ट्रातील सावित्रीच्या लेकींचा रोज बळी जातोय, यांच्यासाठी सरकार कधी करतंय महाराष्ट्र बंद? असा सवाल करत चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.

पुण्यात नेमकं चाललंय काय? असा सवाल उपस्थित करत पोलिस कायदे फक्त कागदावर आणि कायदा व सुव्यवस्था वाऱ्यावर, असं म्हणत चित्रा वाघ यांनी राज्य सरकार आणि पोलिस यंत्रणेला खडेबोल सुनावले.

दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील मैदानात कब्बडीचा सराव करीत असताना आरोपीने मुलीवर कोयत्याने सपासप वार केले. एकतर्फी प्रेमातून हे कृत्य करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हे दाखल केले असून घटनेचा तपास करण्यात येत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

…म्हणून उदयनराजेंची ही सगळी नाैटंकी सुरू आहे; शिवेंद्रराजेंचा टोला

“शिवसेनेकडून भाजपला मोठे खिंडार; लातूर जि.परिषद सदस्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश”

केशर खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे; वाचा सविस्तर

सांगलीत राष्ट्रवादीचा काँग्रेसला धक्का; काँग्रेसच्या सांगली जिल्हा महिला अध्यक्षा राष्ट्रवादीच्या वाटेवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here