मुंबई : करोनाग्रस्तांची माहिती किंवा त्यांची नावं जाहीर करू नये असं सरकारनं स्पष्ट केलं होतं. असं करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही सरकारनं दिला होता. यावरून आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी करोनाच्या आजारातून बरं झालेल्या बाळाचं नाव घेतलं. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई कधी करणार असा सवाल किरीट सोमय्या आंनी केला आहे. यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना एक पत्रही लिहिलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात सहा महिन्याच्या एका बाळाचं करोना पॉझिटिव्ह म्हणून नाव घेतलं होतं. तसंच मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यक्रमादरम्यान पत्रकाराचं नाव करोना पॉझिटिव्ह म्हणून घेतलं होतं. याव्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मिलिंद पाटील यांनी एका नेत्याचं नाव करोना पॉझिटिव्ह म्हणून घेतलं होतं. त्यांच्याविरोधात गुन्हा केव्हा दाखल करणार?,” असा सवाल किरीट सोमय्या यांनी ट्विट द्वारे केला आहे.
कॉरोना पेशंट चे नाव घेतले म्हणून टी वी चॅनल वर गृह मंत्री अनिल देशमुख यांनी कारवाई केली, आत्ता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॉरोना पेशंट चे नाव घेतले, त्यांचा विरोधात कारवाई, एफ आय आर करणार का?@AnilDeshmukhNCP @CMOMaharashtra @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/a3eWiLd9dD
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 17, 2020
महत्वाच्या घडामोडी-
लॉकडाऊनच्या काळात शालेय शुल्क भरण्याची सक्ती करू नये- वर्षा गायकवाड
राज्यसरकारविरुद्ध पंकजा मुंडे आक्रमक; उद्याच्या उद्या जाहीर करा निर्णय बस्स!!
“अजित पवारांचं पालकमंत्र्यांना पत्र; म्हणतात…”
महाराष्ट्रातील रुग्ण वाढ आणि मृत्यूला मुख्यमंत्री जबाबदार- नरायण राणे