उद्धव ठाकरे आजारी असताना मी त्यांना…; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सूचक वक्तव्य

0
6

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत दोन वर्षांपूर्वी पुकारलेल्या बंडामुळे तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुखांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन केलं. आता  सगळ्या घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आजारी पडले होते. त्यांच्या मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. उद्धव ठाकरे आजारी असताना आपण त्यांना रोज फोन करायचो, असं नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं. ते टी.व्ही 9 मराठीशी बोलत होते.

ही बातमी पण वाचा : ‘…हे भाजपला महागात पडेल’; नाना पटोलेंचा भाजपाला इशारा

उद्धव ठाकरे आजारी होते. तेव्हा मी त्यांना फोन केला होता. मी वहिनीला रोज फोन करून विचारायचो. ऑपरेशन पूर्वी त्यांनी मला फोन केला होता. म्हणाले, भाईसाब काय सल्ला आहे. मी म्हटलं, तुम्ही ऑपरेशन करा. बाकी चिंता सोडा. आधी शरीराकडे लक्ष द्या. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचा मान सन्मान करणारच. ते माझं शत्रू नाही. उद्या संकट आलं तर त्यांना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेल. एक कुटुंब म्हणून. पण बाळासाहेबांचे विचार आहे. त्यासाठी मी जगेन, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

‘ईडी लावा, पक्ष फोडा अन्…’; जयंत पाटलांचा भाजपवर निशाणा

 ‘…तर टक्कल करुन फिरेन’; मनसे नेत्याचं विनायक राऊत यांना आव्हान

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांकडून मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here