मुंबई : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात राजधानीमध्ये चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ठाकरे सरकारने आपला पाठींबा दर्शवला आहे. यासाठी 23, 24 आणि 25 जानेवारी रोजी आझाद मैदान येथे शेतकरी आंदोलन होणार आहे. यावर भाजप नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
निदान मातोश्रीतून मुख्यमंत्री बाहेर तरी पडतील. पिंजऱ्याच्या बाहेर आल्यावर लोक मुख्यमंत्री कसा आहे हे तरी किमान पाहतील, असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. एसटीचे पगार 2-3 महिने होत नाहीत, बेस्टचंही तसंच आहे. सरकारची अवस्था डबघाईला आली आहे. त्यामुळे आधी ते सुधारा, मग रस्त्यावर या. आमचा काय रस्त्यावर येण्यासाठी नकार नाही, असं राणे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
धनंजय मुंडेंचा राजीनामा देण्याची हमी शरद पवार देत असतील तर…- प्रकाश आंबेडकर
राज्य सरकारच्या घोळामुळे मराठा आरक्षण अडचणीत- देवेंद्र फडणवीस
‘हे’ तर राज्य सरकारचं तुघलकी फर्मान; वीजपुरवठा खंडीत करण्याच्या निर्णयावरुन भाजपची टीका
ठाकरे सरकार फक्त टक्केवारीत नंबर वन; अतुल भातखळकरांचा टोला