आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : ‘जो मैं बोलता हूं वही करता हूं, और जो मैं नहीं बोलता, वो डेफिनेटली करता हूं. त्यामुळे माझ्या नादी लागू नका, त्यामुळे पालकमंत्र्यांनी आणि आमदारांना हे लक्षात असू द्यावे. जेव्हा निवडणूक लागेल, तेव्हा मावळमधला आमदार भाजपाचाच राहील, असं म्हणत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधलाय.
आज ज्या पद्धतीने महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये विसंवादाची लढाई दिसत आहे आणि त्या तीन पक्षातल्या दोन पक्षांचे जे संकेत आमच्याकडे येत आहेत, या सगळ्याचा अभ्यास केला तर राज्यात केव्हाही निवडणूक लागू शकेल, असं आशिष शेलार यांनी म्हटलंय.
मावळ शेतकरी गोळीबारात निष्पाप तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. 185 शेतकऱ्यांवर गुन्हे करण्यात आले. मात्र फडणवीस सरकारने त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले होते. ज्याने गोळ्या झाडल्या त्याला आज मुंबईमध्ये प्राईम पोस्टिंग दिली आहे. मावळ मधील शेतकऱ्यांचे खरे शत्रू कोण हे आज पुन्हा एकदा सांगायचं आहे, असंही आशिष शेलार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“मुख्यमंत्री पदावर असो वा नसो, आजही शेतकऱ्यांना फडणवीसांचा आधार वाटतो”
कंगना रणौतने घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट; चर्चांना उधान
…तर हे तुमचं कर्तव्य आहे; उदयनराजेंचा अजित पवारांना खोचक सल्ला
कोण काम करतंय हे समजूतदार लोकांना माहिती आहे; शिवसेनेचं अमित ठाकरेंना प्रत्युत्तर