मुंबई : नायगाव पोलिस वसाहतीमधील पोलीस कुटुंबियांना घरे खाली करण्याची नोटीस सरकारकडून बजावण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजप नेते प्रविण दरेकर यांनी तातडीने पोलिस वसाहतीला भेट दिली. तसेच त्यांनी पोलीस कुटुंबियांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अविरत मेहनत करून जनतेचं संरक्षण करणारा माझा पोलिस रस्त्यावर राहणार का? आम्ही असं होऊ देणार नाही. वेळ पडल्यास बुलडोझरखाली आडवे पडू, पण पोलिसांच्या कुटुंबीयांना बेघर होऊ देणार नाही, असा इशारा दरेकरांनी यावेळी राज्य सरकारला दिला.
दरम्यान, मोठे पगार घेणारे आयपीएस आपल्या राहण्याची सोय करू शकतात. परंतु अल्प वेतन असणारे पोलिस बांधव मात्र आपल्या वेतनामधून साधे झोपडेसुद्धा घेऊ शकत नाही. सरकारने याचा विचार नोटिस बजावण्यापूर्वी करायला हवा होता, असा हल्लाबोल दरेकरांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
पूरग्रस्तांसाठी जाहीर पॅकेज मध्ये शेतकऱ्यांसाठी मदत दिसत नाही- देवेंद्र फडणवीस
“राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार यात शंका नाही”
सामान्य मुंबईकरांना छळण्यात ठाकरे सरकारला कसा विकृत आनंद मिळतो हे दिसलं- केशव उपाध्ये