मुंबई : मनसेचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करू, असं म्हणत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज्य सररकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
सविनय कायदेभंग आंदोलन प्रकरणी संदीप देशपांडे यांच्यावर कल्याण रेल्वे पोलिसांकडून कलम 107 अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यानुसार सुनावणीसाठी संदीप देशपांडे कल्याण रेल्वे एसीपी कार्यालयात हजर झाले होते. यानंतर संदीप देशपांडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, आम्ही जे आंदोलन केलं ते लोकहितासाठी केलं. कायद्याची प्रोसिजर आता पार पाडत आहोत, मात्र त्यांनी हे लक्षात ठेवावं ज्यावेळेला राज साहेबांचं सरकार येईल तेव्हा हा सर्व हिशोब चुकता होईल, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कोरोनामुक्त”
आठवलेंचा एक आमदार-खासदार तरी आहे का?; आठवलेंच्या ऑफरवर शरद पवारांचा टोला
“राज्य सरकारकडून दसरा, नवरात्राैत्सवाची नियमावली जाहीर”
कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का? मनसेचा मुख्यमंत्र्यांना सवाल