Home महाराष्ट्र काँग्रेसने सत्तेत असताना गरिबांच्या भावनांशी खेळ केला- पंकजा मुंडे

काँग्रेसने सत्तेत असताना गरिबांच्या भावनांशी खेळ केला- पंकजा मुंडे

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : काँग्रेसने केंद्रात व राज्यात सत्तेत असताना गरिबांच्या भावनांशी खेळ केला. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबीचे भांडवल न करता गरिबी हटविण्यासाठी अंत्योदय योजनेचा नारा दिला,असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

भाजपच्या रूपाने देशात सर्वात मोठे संघटन उभे राहिले आहे. संघटनांच्या माध्यमातून देशभरात भाजपने सत्ता स्थापन केली. मोदी सरकारमुळे देशात सर्व संकल्प पूर्ण होण्याचा सुवर्णकाळ सुरू आहे. कोरोनाकाळात कार्यकर्त्यांनी जनतेची सेवा केली असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा : समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल होणार की नाही?; दिलीप वळसे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…

काँग्रेसने सत्ताकाळात गरिबांच्या भावनांशी खेळ केला.पंतप्रधान मोदींनी गरिबीचे भांडवल मोडीत काढत गरिबी हटविण्यासाठी अंत्योदय योजनेचा नारा दिला. स्थानिक स्वराज्य संस्था ताकदीने लढायच्या आहे. विरोधकांना कमजोर समजू नका. परिवार म्हणून वज्रमूठ करून निवडणुकांना सामोरे जायचं आहे,  असं आवाहन पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“औरंगाबाद पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला; काँग्रेसच्या सभापतींचा पक्षाला रामराम”

अखेर मुख्यमंत्री ठाकरेंनी मान्य केले की ते घरकोंबडे आहेत; अतुल भातखळकरांची टीका

शिवसेनेची मोठी घोषणा; आणखी एका राज्यात लढवणार निवडणूक