मुंबई : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांनी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. यावरुन भाजप नेते विनोद तावडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.
संसदेत कृषी कायदा मांडला तेव्हा त्याला पाठिंबा दिला गेला. त्यानंतर भूमिका कशी बदलते? काही पक्ष तटस्थ राहिले ते पक्ष आज विरोध कसा करु शकतात? असा सवाल करत विनोद तावडे यांनी शिवसेनेवर टीका केली .
आधीच्या सरकारमध्ये कायदा मांडताना काही लोकं सरकारमध्ये होते. मात्र, आज ते विरोध कसे करतात? असा जर विरोध असेल आणि त्यासाठी भारत बंदला पाठिंबा असेल तर या मुद्यावरून राजकारण केलं जातंय, असं विनोद तावडे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
आर्चीच्या ‘या’ नव्या लूकनं पाडलीय भुरळ; पहातच राहाल
राहुल गांधींना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले- बाळासाहेब थोरात
झोपेचं सोंग घेतलेल्या मोदी सरकारला जागं करण्यासाठी ‘भारत बंद’ महत्त्वाचा- अशोक चव्हाण
7/12 वाचवायचा असेल तर 8/12 महत्त्वाचा आहे- बच्चू कडू