“नारायण राणेंनी शिवसेना सोडली, तेंव्हा संजय राऊत बाथरूममध्ये लपले होते”

0
310

मुंबई : वेळ आली तर शिवसेना भवन देखील फोडू, असं वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलं होतं. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, भाजपमध्ये उपऱ्यांना आणि बाटग्यांना स्थान नव्हतं मात्र मूळ विचारांचे लोक भंगारात आणि बाटगे पालखीत बसून नाचवले जात आहेत. त्यामुळे पक्षाचा अंत:काळ जवळ आला आहे, अशी टीका केली होती. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

महामंडळं, पदं सगळ्या खास लोकांना, बाळासाहेबांचे निष्ठावंत दिसले नाहीत. बाटग्यांच्या माध्यमातून चालणारी शिवसेना असल्याचं नितेश राणे यांनी यावेळी म्हटलं. तसेच ज्यावेळी नारायण राणे यांनी सेना सोडली तेंव्हा सामना समोरच्या सभेत संजय राऊत बाथरुममध्ये लपले होते. समोर आले तर ततपप होतं आणि आता धमक्यांची भाषा वापरली जात आहे, असा हल्लाबोल नितेश राणेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

राज ठाकरे हे माझे आवडते राजकीय व्यक्तिमत्व, लवकरच त्यांची भेट घेणार- चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्र्यांच्या दाैऱ्याला जेवढा खर्च, कोकणातील पूरग्रस्तांना तेवढीही मदत नाही; निलेश राणेंची टीका

सरकार म्हणून जे आपल्या हिताचे आहे तेच करणार, तुम्ही अजिबात काळजी करू नका; मुख्यमंत्र्यांचा भिलवडीत पूरग्रस्तांशी संवाद

राज्यात अनेक संकटे आली, पण उद्धव ठाकरेंनी हिंमत दाखवली; शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांचं काैतुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here