मुंबई : राज्यात सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच केंद्र आणि राज्य सरकारकडून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु यावरूनच आता राजकारणाला सुरूवात झाली आहे. भाजपचे नेते निरंजन डावखरे यांनी उद्धव ठाकरेंच्या कामगिरीवर टिका केली होती . यावर शिवसनेनं सामनामधून प्रत्यृत्तर दिलं आहे.
महाविकास आघाडी सरकारात कुरबुरी नाहीत. फाटाफुटीचा करोना व्हायरस येथे कधीच मेला. मुख्यमंत्री आता मैदानात उतरले आहेतल ते महाराष्ट्र विषाणूमुक्त करण्यासाठी. फडणवीस यांनी वेगळ काय केलं असतं?, करोना विषाणू गिळून त्यांनी ढेकर दिला असती की त्या विषाणूच्या मागे सीबीआय, ईडी वगैरे लावून या व्हायरसची बोलती बंद केली असती? असा सवाल करत शिवसेनेनं फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
फडणवीस यांना राज्य चालविण्याचा अनुभव आहे व उद्धव ठाकरे यांना आहे की नाही हे महाराष्ट्राची जनता ठरवेल. भाजपातील उपर्यांना हा अधिकार कोणी दिला?, असंही सामनामधून म्हटलं आहे.
दरम्यान, राज्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाही तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी देवेंद्र फडणवीस यांची गरज आहे, असं निरंजन डावखरे यांनी म्हटलं होतं.
महत्वाच्या घडामोडी-
शेकहँड टाळा, नमस्कार करा; शरद पवारांच जनतेला आवाहन
सकाळी पत्रकार परिषद घेतली म्हणजे मुख्यमंत्र्यांचं काम संपलं; निलेश राणेंची बोचरी टिका
शरद पवार यांच्या संस्कारामुळे जबाबदारीला प्राधान्य- राजेश टोपे
जातियवादाच्या कोरोनाव कधी आळा बसणार- रामदास आठवले