“एकटा संभाजी काय करणार?; त्याच्या मागे 48 खासदारांनी दिल्लीत ताकद लावावी”

0
314

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भाजप खासदार संभाजीराजेंच्या नेतृत्वात कोल्हापुरमध्ये पहिलं मराठा क्रांती मूक आंदोलन पार पाडलं. पाऊस असतानाही आंदोलनाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. समाजाने हा विषय दिल्लीपर्यंत ठामपणे नेला पाहिजे. संभाजीराजे काही ना काही करत राहतील, पण एकावर जबाबदारी शक्य नाही. तुमचं सहकार्य लाभेल. सर्व 48 खासदारांनी दिल्लीत ताकद लावावी असं खासदार संभाजीराजेंचे वडील छत्रपती शाहू महाराज म्हणाले आहेत.

दरम्यान, हा विषय पंतप्रधानांपर्यंत न्यायला हवा. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान सकारात्मक असल्याचं सांगण्यात आलं असलं तर अद्याप त्यांचे विचार काय आहेत हे कळालेलं नाही. ते स्पष्ट झालं तर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात येईल. बहुमत असलं तर त्यांच्याकडे जाऊन येण्यासाठी विनंती केली पाहिजे, असंही छत्रपती शाहू महाराज यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भाजप कार्यकर्त्यावर हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम करू; निलेश राणेंचा इशारा

शिवसेना भवन हे आमचं श्रद्धास्थान, कारण नसताना अंगावर याल तर शिंगावर घेणार- किशोरी पेडणेकर

बाळासाहेबांना दिलेल्या वचनाचे कारण सांगून…; प्रवीण दरेकरांची शिवसेनेवर टीका

बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कुठे आणि आज महिलांवर हात उगारणारी शिवसेना कुठे?- केशव उपाध्ये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here