Home महाराष्ट्र ‘उद्धव ठाकरे यांचं सूचक वक्तव्य? म्हणाले, राजकारणात उद्या…’

‘उद्धव ठाकरे यांचं सूचक वक्तव्य? म्हणाले, राजकारणात उद्या…’

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

‘राजकारणात उद्या काय होईल ते सांगता येईल का?’, असं वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलं आहे. या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येणार का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

ही बातमी पण वाचा : शांतिनिकेतनचे उपक्रम राज्यात राबवणार – शिक्षणमंत्री दादा भुसे

उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं कामकाज कुठपर्यंत झालं हे पाहण्यासाठी स्मारकस्थळी भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या उद्घाटनावेळी कोण-कोण येईल? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी त्यावेळी जे पंतप्रधान असतील त्यांच्या हस्ते स्मारकाचं उद्घाटन होईल, असं उत्तर दिलं.

दरम्यान, शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या कामकाजाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात काम सुरु होईल. या दोन्ही टप्प्यांचं कामकाज 23 जानेवारी 2026 च्या आधी पूर्ण होईल, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धेत सांगलीचा बोलबाला; सांगलीच्याब्रेन बूस्टर अकॅडमीचा 100 टक्के निकाल

 धनंजय मुंडे राजीनामा देणार का?; धनंजय मुंडेंनी स्वतः केला खुलासा, म्हणाले…

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या क्रीडामहोत्सवाचे उद्घाटन