मुंबई : श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकवण्यासाठी बांधले जात आहे, असा टोला शिवसेनेने सामनामधून भाजपला लगावला होता. त्यावरुन भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.
ब्रिगेडी हिंदुत्ववाद्यांनी रामवर्गणीला अग्रलेखातून लक्ष्य करावे हे स्वाभाविकच. ज्यांच्या पक्षाचा पिंड खंडणी आणि टक्केवारीवर पोसलाय त्यांना रामवर्गणीचे महत्त्व आणि ममत्व काय असणार?,” असं अतुल भातखळकर म्हणाले.
दरम्यान, “ज्यांच्या ताटात अबूची बिर्याणी, इटालियन मातोश्रींचा पिझ्झा आणि धोरणी साहेबांची वांगी आहेत त्या नव ब्रिगेडी बाटग्याना राम वर्गणीच्या नावाने करपट ढेकर आले नसते तरच आश्चर्य होते, असंही भातखळकरांनी म्हटलं आहे.
ब्रिगेडी हिंदुत्ववाद्यांनी रामवर्गणीला अग्रलेखातून टार्गेट करावे हे स्वाभाविकच. ज्यांच्या पक्षाचा पिंड खंडणी आणि टक्केवारीवर पोसलाय त्यांना रामवर्गणीचे महत्व आणि ममत्व काय असणार???
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 21, 2020
महत्वाच्या घडामोडी-
महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवावी अशी माझी इच्छा- देवेंद्र फडणवीस
महाराज आज असते तर पहिला कडेलोट संजय राऊतांचा केला असता- निलेश राणे
शिवसेनेची भूमिका राम मंदिर विरोधी- आशिष शेलार
“…म्हणजे रामाच्या आड 2024 चा निवडणूक प्रचार”