ठाकरे ब्रँड हे काय नवीन काढलं?; चंद्रकांत पटलांचा शिवसेनेला टोला

0
1

मुंबई : महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ठाकरे हा ब्रँड आहे असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडलं होतं. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी राऊत आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड हे काय नवीन काढलं? असं म्हणत महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराज हेच ब्रँड आहेत. त्याशिवाय कोणताच ब्रँड नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे. महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचाच ब्रँड आहे. त्यांच्याशिवाय दुसरा कोणताच ब्रँड नाही, असं चंद्रकात पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा एकदा उघडे पडले आहे, असं म्हणत खासदार संजय राऊत सामनामधून म्हटलं होतं.

महत्वाच्या घडामोडी-

कंगनाचा उद्धव ठाकरेंवर आणखी एक ‘ट्विट’हल्ला; म्हणाली…

…म्हणून ठाकरे सरकार बदनाम आहे; किरीट सोमय्यांचा टोला

मराठा समाजाला आरक्षण देण्याची तुमची कधीच इच्छा नव्हती; चंद्रकांत पाटलांची शरद पवारांवर टीका

ही असंवेदनशीलता नव्हे तर काय? राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here