नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या ‘टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा काल रात्री BCCI नं केली.
बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात अनुभवी रविचंद्रन अश्विनसह एकूण 5 फिरकी गोलंदांजांना संधी देण्यात आली आहे. रविचंद्रन अश्विनसह, रवींद्र जडेजा, राहुल चहर, वरूण चक्रवर्ती, अक्षर पटेल या फिरकीपटूंना भारतीय संघात संधी मिळाली आहे.
बीसीसीआयनं एकूण 18 खेळाडूंची संघात निवड केली असून त्या 18 पैकी 3 खेळाडू राखीव असून, त्या राखीव खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, दीपक चहर यांचा समावेश आहे. सलामीवीर शिखर धवन आणि युजवेंद्र चहल यांना संघातून वगळण्यात आलं असून चहलऐवजी मुंबई इंडियन्सचा फिरकी गोलंदाज म्हणून राहुल चहरला संधी देण्यात आली आह.
दरम्यान, राहुल चहर हा सध्या मुंबई इंडियन्स संघासोबत आबू धाबीमध्ये आयपीएलच्या उर्वरित सामन्याचा सराव करत आहे. मात्र संघात स्थान मिळाल्याची बातमी समजल्यानंतर चहरला सुरुवातीला त्यावर विश्वासच बसला नाही. नंतर त्याची ही गोड बातमी सांगतानाचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने शेअर केला.
! That moment when you read your name in the World Cup squad! #OneFamily #MumbaiIndians #T20WorldCup #KhelTakaTak @rdchahar1 @MXTakaTak MI TV pic.twitter.com/VVqWQihJzM
— Mumbai Indians (@mipaltan) September 8, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“भाजप करुणा शर्मा यांच्या पाठीशी, त्यांच्यासाठी आंदोलन करण्याबाबत भाजप विचार करेल”
“मोठी बातमी! छगन भुजबळ यांना मोठा दिलासा, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील सर्व आरोपातून मुक्तता”
पुण्यात गणेशोत्सव काळात संचारबंदी किंवा जमावबंदी नाही- पुणे पोलिस
राज्यातील कीर्तनकारांना महिन्याला प्रत्येकी 5 हजार मिळणार; ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय