माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, बापालाच जाऊन विचार- चित्रा वाघ

0
173

मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर बोलताना मीही शरद पवारांच्या तालमीत तयार झाली आहे. ते शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना पाठीशी घालणार नाहीत, असं म्हटलं होतं. यावरून अमोल मिटकरांनी वाघ यांच्यावर टीका केली होती. अमोल मिटकरींनी केलेल्या टीकेला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. टीव्ही 9 शी बोलताना त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अमोल मिटकरी आता आला आहे. भावा माझ्या, तुला काय माहिती?, तुला आमदारकी दिली आहे पक्षाने, नेटाने काम कर. चांगला आवाज आहे बोलत राहा. बाकी माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, बापालाच जाऊन विचार, साहेबांना विचार, ते सांगतील. यावर बोलून फार महत्त्व देण्याची गरज नाही,  असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

दरम्यान, आपण भाजपात गेला नसता तर देवेंद्र फडणवीसांनी तेव्हाच गुन्हा दाखल केला असता. आपण साहेबांच्या तालमीत तयार झाल्या आहात. त्यामुळे दिशाभूल करू नये, असं अमोल मिटकरींनी म्हटलं होतं.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजपच्या ‘या’ खासदाराचे कोरोनामुळे निधन”

सांगलीतील भाजपच्या ‘त्या’ सहा नगरसेवकांना नोटीस

अजित पवार कुठल्या राजकीय बुद्धीने काम करत आहेत कळतच नाही; पंकजा मुंडेंचा टोला

शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्य नागरिकांचं वीज कनेक्शन तोडणी थांबवली जाईल- अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here