मुंबई : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा, रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्य सरकारला दिला होता. यावर काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या 5 वर्षात फडणवीसांनी ओबीसींचा कोणता प्रश्न सोडवला ते सांगावं. मी ओपन चर्चा करायला तयार आहे. शिवाजी पार्कवर ओपन चर्चा होऊनच जाऊद्या, असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी फडणवीसांना खुलं आवाहन दिलं आहे.
दरम्यान, भाजप सरकारने जाता जाता केवळ 60 कोटी रुपये ओबीसींना दिले तर मराठा समाजाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटी रुपये देण्यात आले. त्यामुळे भाजप कोणत्या ओबीसी प्रेमाच्या गप्पा मारत आहे? असा सवालही वडेट्टीवारांनी यावेळी उपस्थित केला.
महत्वाच्या घडामोडी-
“काँग्रेसच्या ‘या’ नेत्यामुळं शरद पवारांचं पंतप्रधानपद हुकलं”
“ओबीसी समाजाला डिवचण्याचा प्रयत्न करु नका, त्यांच्या हक्काचा एक कणही कमी होऊ देणार नाही”
“भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची लागण”
ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू; देवेंद्र फडणवीसांचा सरकारला इशारा