“नितेश राणे आणि निलेश राणेंची उंची किती, ते बोलतात किती?”

0
588

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर भाजप नेते नितेश राणे व निलेश राणे यांनी खळबळजनक आऱोप केले होते. पवार यांचे दाऊदशी संबंध असल्याचे आरोप राणे बंधूंनी केला होता. यावरून आता

पवार यांचे दाऊदशी संबंध असल्याचे आरोप केले होते. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी जोरदार टीका केली आहे. नितेश राणे व निलेश राणे यांची उंची किती? ते बोलतात किती? आपण कोणाबद्दल बोलतो याचे भान विसरले असून पूर्वी नितेश राणे रात्री औषध घेऊन बोलायचे परंतु, आता दिवसाही औषध घेऊन बोलतात अस वाटू लागलं असल्याचा टोला परांजपे यांनी लगावला.

हे ही वाचा : मला कितीही अडकवण्याचा प्रयत्न केला, तरी मी गप्प बसणार नाही; 2 तासांच्या चाैकशीनंतर फडणवीस आक्रमक

दरम्यान, नितेश राणे व निलेश राणे यांनी शरद पवारांवर केलेल्या आरोपानंतर, आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून या विधानाचा निषेध करत नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी करत नौपाडा पोलिसांना निवेदन दिलं आहे. तसेच या निवेदनाच्या अर्जासोबत राष्ट्रवादी काँग्रेस कडून नौपाडा पोलिसांना पेनड्राईव्ह देखील दिला आहे. या पेन ड्राईव्हमध्ये नितेश राणे आणि निलेश राणे यांनी शरद पवारांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे व्हिडिओ, भाषणे आणि केलेल्या ट्वीटचे स्क्रीन शॉट्स असे पुरावे आहेत. त्यामुळे या पेन ड्राईव्ह मधील सर्व पुरावे खरे आहेत, कुठेही तारीख बदललेली नाही. तसेच सोबत जोडलेल्या पुराव्याच्या आधारे लवकरात लवकर नितेश राणे व निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करावा अशी विनंती राष्ट्रवादीकडून नाैपाडा पोलिसांना करण्यात आली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीनंतर चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला इशारा; म्हणाले…’सरकारला अजून नऊ दिवस…’

चौकशीनंतर देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले…

राज्यभर आंदोलन करून भाजप राजकीय भांडवल करत आहे; काँग्रेस नेत्याची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here