Home महाराष्ट्र बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमध्ये फरक काय?; यावर शरद पवार म्हणाले…

बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमध्ये फरक काय?; यावर शरद पवार म्हणाले…

मुंबई : “बाळासाहेब आणि उद्धव यांच्यामध्ये फरक आहे. बाळासाहेब हे तडकाफडकी निर्णय घेऊन मोकळे व्हायचे”, असं राऊत यांनी म्हटलं,व यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीमध्ये बराच फरक आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

“बाळासाहेब आणि उद्धव यांच्यामध्ये हा फरक आहे. बाळासाहेब हे सत्तेच्या पाठीमागचा एक महत्वाचा घटक होते. त्यांच्या विचारांनी महाराष्ट्रात सत्ता चालली हे महाराष्ट्राने आणि देशाने बघितली. आज सत्ता विचारांनी चालली नाही आज प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून सत्ता चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे हा मोठा फरक दोघांमध्ये आहेच,” असं पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बाळासाहेब हे सत्तेमागील प्रमुख व्यक्तीमत्व होतं तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असून त्यांना प्रत्यक्ष कारभार चालवायचा असल्याचे हा फरक असणे स्वाभाविक आहे, असंही पवारांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

धारावीनं करून दाखवलं… जागतिक आरोग्य संघटनेकडून मुख्यमंत्र्यांच कौतुक

105 जागा मिळूनही महाराष्ट्रात भाजपाची सत्ता का नाही?; यावर शरद पवार म्हणाले…

…म्हणून ‘मी पुन्हा येईन’ ही घोषणा चेष्टेचा विषय झाला- शरद पवार

“मुख्यमंत्र्यांचं ‘हे’ काम पाहून देवेंद्र फडणवीसांचे डोळे पांढरे होतील”