Home महाराष्ट्र ‘ही’ शेतकऱ्यांशी बेईमानी नाही तर काय?; बच्चू कडू यांचा केंद्र सरकारला सवाल

‘ही’ शेतकऱ्यांशी बेईमानी नाही तर काय?; बच्चू कडू यांचा केंद्र सरकारला सवाल

अमरावती : केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी उठवलेली कांद्यावरील निर्यातबंदी आता पुन्हा लागू केली आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

कांदा प्रश्नावर दिल्लीत जाऊन छुप्या पध्दतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी केंद्र सरकारला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी नाशिकच्या सभेत म्हणायचे, मी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत बेईमानी करणार नाही. मग ही बेईमानी नाही तर काय आहे, असा प्रश्न विचारत बच्चू कडू यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, मोदी सरकारने पुन्हा शेतकऱ्याच्या छातीवर तलवार चालवून त्याला रक्तबंबाळ केल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मला बोलवा, मी कुठेही क्रिकेट खेळायला तयार आहे- एस श्रीसंत

कृपया आमचे पगार घ्या, पण खासदार निधी कापू नका; नवनीत राणा यांची लोकसभेत विनंती

तुम्ही कंगणाच्या जीवावर राज्य चालवता का? प्रविण दरेकरांचा राज्य सरकारला सवाल

महाराष्ट्रात मुघल सत्तेत आले आहेत म्हणून इथे तसं काही होईल वाटत नाही; निलेश राणेंचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला