मुंबई : कालपासून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते एकमेकांवर आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.
तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडलं. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूरही करण्यात आला आणि भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
काल जे घडलं ते अतिशय लाजीरवाणं होतं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर टीका केली. ही आपली संस्कती नाही. ही आपली परंपरा नाही, असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
12 आमदारांच्या निलंबनाविरोधात कोर्टात जाणार- चंद्रकांत पाटील
“अजित पवार ही वेळ भुलथापांची व राजकारण करण्याची नाहीये, जरा तरी माणुसकीचे भान ठेवा
“सांगलीचे महापाैर दिग्विजय सुर्यवंशी यांना कोरोनाची लागण”
अजित पवार दाखवतात तिखट, पण कामात एकदम पोकळ माणुस; निलेश राणेंचा टोला