Home महाराष्ट्र महाराष्ट्रात घडलं तेच अमेरिकेतही घडेल; जो बायडन यांच्या ‘सातारा स्टाईल’ भाषणावर रोहित...

महाराष्ट्रात घडलं तेच अमेरिकेतही घडेल; जो बायडन यांच्या ‘सातारा स्टाईल’ भाषणावर रोहित पवारांनी केल्या भावना व्यक्त

मुंबई : फ्लोरिडात अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी जो बायडन यांचं भाषण सुरु असताना पावसाला सुरूवात झाली. परंतु त्यांनी आपलं भाषण न थांबवता ते सुरूच ठेवले. यामुळे अनेकांना शरद पवार यांच्या साताऱ्यातील ऐतिहासिक सभेची आठवण झाली. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जेंव्हा सभेत जोरदार पाऊस येतो पण नेता आणि जनता तसूभरही विचलित होत नाही तेंव्हा तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो, असंच म्हणावं लागेल. २०१९ ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे!, असं ट्विट करत रोहित पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


महत्वाच्या घडामोडी-

“एक वेळ अशी येईल की, एका मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील”

सुर्यकुमार यादवने विराट कोहलीविषयी केलंलं 4 वर्षापूर्वीचं ‘ते’ ट्विट व्हायरल

“शरद पवार यांच्याकडे हर मर्ज की दवा है’, म्हणून राज्यपालांनी राज ठाकरेंना पवारांना भेटण्याचा मार्ग दाखवला”

OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का?, विजय वडेट्टीवारांचा सवाल