मुंबई : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच रेमडिसिवीर इंजेक्शनचा तुटवड्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. याच स्थितीत भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी खास दिल्लीहून विमानाने नगरसाठी 10 हजार रेमडिसिवीर इंजेक्शन्स आणले होते. यावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार सुजय विखेंचा व्हिडीओ आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून 10 हजार इंजेक्शन आणल्याचा केला गेलेला दावा हे संपूर्णपणे संशयास्पद आहे. एकीकडे नगर जिल्ह्यातील नागरिक इंजेक्शनसाठी मदतीची याचना करत असताना असे व्हिडीओ ही नागरिकांची चेष्टा आहे., असं रूपाली चाकणकर म्हणाल्या.
एकतर सुजय विखेंनी त्या बॉक्स मध्ये काय होते हे स्पष्ट करावे आणि जर रेमडिसिव्हीर असतील तर ते कुणाला वाटले अथवा सामान्य जनतेला ते कुठे मिळतील याची माहिती द्यावी., असंही रूपाली चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
एकतर सुजय विखेंनी त्या बॉक्स मध्ये काय होते हे स्पष्ट करावे आणि जर रेमडिसिव्हीर असतील तर ते कुणाला वाटले अथवा सामान्य जनतेला ते कुठे मिळतील याची माहिती द्यावी.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) April 25, 2021
महत्वाच्या घडामोडी –
जडेजा पडला आख्ख्या RCB संघावर भारी! चेन्नईचा 69 धावांनी विजय
“राऊतांनी फुकटचा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला असता तर अर्थव्यवस्थेला गती देता आली असती”
“…पण विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो”
“स्फोटके कुणी ठेवली?; चंद्रकांत दादांनी या प्रकरणातील खरे काय ते सांगावं”