Home महाराष्ट्र उद्धव ठाकरेंना, राहुल गांधींना शेतीमधलं काय कळतं?; नारायण राणेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरेंना, राहुल गांधींना शेतीमधलं काय कळतं?; नारायण राणेंचा हल्लाबोल

कणकवली : शेतकऱ्यांच्या हिताचा हा नवा कृषी कायदा आहे. या कायद्याने सर्व बंधनं काढून टाकली तर मग चुकलं काय? ही राजकीय आंदोलनं आहेत. राहुल गांधींना, उद्धव ठाकरेंना शेतीमधलं काय कळतं? काहीच कळत नसल्याने ते समर्थन कसं करणार? विरोधच करणार., असं म्हणत भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ कणकवली येथे आज भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. यावेळी नारायण राणे बोलत होते.

पंतप्रधान मोदींकडून एका बाजूला देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न सुरू आहेत व दुसऱ्या बाजूला नागरिकांना समृद्ध करण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे. तसेच, या देशाचा प्रमुख घटक शेतकरी आहे. आमच्या शेतकऱ्याला सबळ बनवलं पाहिजे, आर्थिक समृद्ध बनवलं पाहिजे. या कष्टकऱ्याला त्याच्या श्रमाचा फायदा मिळाला पाहिजे. या दृष्टीकोनातूनच त्यांनी हे विधेयक आणलं आहे., असं नारायण राणे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

औरंगाबादच्या नामांतरावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

पोलीस भरती तात्काळ रद्द करा, अन्यथा उग्र आंदोलन छेडू; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

“छत्रपती संभाजी महाराज आमचे आराध्य दैवत, त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये”

अहो दादा, असं मोघलांसारखं काय बोलता; अमोल मिटकरींचा घणाघात