Home महाराष्ट्र “बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधलं?”

“बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधलं?”

मुंबई : कोरोनामुळे यंदा राज्य सरकारने आषाढी वारी सोहळ्यावर निर्बंध घातले आहेत. याच पार्श्वभूमीवर पायी वारीस मनाई असतानाही शासनाचा आदेश झुगारुन पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलं. त्यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आलं आहे. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आणि विठ्ठल-वारकरी यांचे नाते अवर्णनीय असल्याचं सांगत बंडातात्या यांच्यावर केलेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीसांनी निषेध केला आहे.

बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधलं? काहीच मध्यम मार्ग नव्हता? वारकर्यांचा असा अपमान?, असे सवाल देवेंद्र फडणवीसांनी यावेळी उपस्तिथ केले आहेत.

दरम्यान, केवळ मानाच्या पालख्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. वाखरीपासून दीड किलोमीटर अंतरापर्यंत प्रतिकात्मक पायी वारी काढली जाणार आहे. मात्र सामान्य वारकऱ्यांना मात्र पायी वारीस मनाई करण्यात आली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“संभाजीराजे तुम्ही भाजपमधून बाहेर पडा, आम्ही तुम्हांला मुख्यमंत्री करायला तयार आहोत”

“देशाचे कृषिमंत्री राहिलेल्या पवार साहेबांनी आता तरी शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे प्रयत्न सोडावेत”

“विश्वजीत कदम आणि पृथ्वीराज चव्हाणांना धक्का; डॉ.अतुल भोसले यांच्या जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचा दणदणीत विजय”

“घरगुती गॅस, इंधन दरवाढ, महागाई विरोधात राष्ट्रवादीचं 2 दिवस राज्यव्यापी आंदोलन”