मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यावरुन राज्य सरकारवर आरोप केला होता. त्यावर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात काही घडलं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही म्हणायचं नसतं. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनादेखील काही म्हणायचं नसतं. मात्र, राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना लगेचच प्रतिक्रिया द्यायची असते. निष्ठा दाखवण्यासाठी केवढी केविलवाणी धडपड, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी लगावला हसन मुश्रीफ यांना टोला लगावला आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटलांची ही मागणी म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’, असा घणाघात हसन मुश्रीफ यांनी केला होता. मुश्रीफांच्या या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिलं आहे
महत्वाच्या घडामोडी-
न्यायालय आणि कायद्याचा आदर करण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर; त्यामुळे…
सामनाचे संपादक तोंडावर पडले- नारायण राणे
जिम सुरू करा; सुप्रिया सुळेंची मागणी
…पण नियती कोणालाही सोडत नाही; न्यायालयाच्या निकालानंतर निलेश राणेंचं ट्विट