भाजपने विरोधी पक्ष म्हणून काम करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं स्वागत; जयंत पाटलांचा टोला

0
321

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : सरकार कधी येणार याच्या चर्चा बंद करा. आपण प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करायचं ठरवलं आहे, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावरून आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : राज्यात प्रत्येकजण मुख्यमंत्री, मोदी सरकारमध्ये मात्र कुणालाच मंत्री आहोत असं वाटत नाही; राऊतांचा फडणवीसांना टोला

भाजपने दोन वर्षानंतर विरोधी पक्षाचे काम करायला सुरुवात केलीय ही चांगली गोष्ट आहे, असा उपरोधक टोला जयंत पाटलांनी यावेळी लगावला.

भाजपने आता महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक होऊन रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे, यावर माध्यमांनी सवाल केला असता, त्यावर जयंत पाटील म्हणाले, भाजपने आपले मनोगत व्यक्त केले ही चांगली गोष्ट आहे. आता राज्यातील जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडायला सुरुवात करतील.

महत्वाच्या घडामोडी –

…तर अख्खा हिंदुस्थान पेटल्याशिवाय राहणार नाही; भाजपच्या ‘या’ नेत्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीला इशारा

आम्ही दिवसा स्त्रीची पूजा करतो, आणि रात्री त्यांच्यावर सामुहिक बलात्कार करतो; ‘या’ अभिनेत्याचं वादग्रस्त विधान

“संजय राऊत यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; तर्कवितर्कांना उधाण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here