आगामी महापालिका निवडणुका आम्हीच जिंकणार; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

0
314

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : येणाऱ्या मुंबई महापालिकांच्या निवडणुकीत भाजपच विजयी होईल, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा : संजय राऊतांसोबत केलेल्या डान्सवर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंनी दिलं जोरदार उत्तर; म्हणाल्या…

मला वाटतं की, आघाडी सरकार स्ट्रटेजिकल अलायन्स करतील, ते एकत्र लढणार नाहीत. जिथे ज्याचा फायदा आहे तो तशी भूमिका घेतो. पण त्यांनी काहीही भूमिका घेतली तरी महापालिका निवडणूका आम्हीच जिंकणार, असं फडणवीस म्हणाले .

दरम्यान, यावेळी बोलताना फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला.
एका वेगळ्या भावनेतून अजित पवारांसोबत आम्ही सरकार तयार केलं होतं. मात्र आजही मला त्या गोष्टीचा पश्चाताप आहे. पहाटेचा शपथविधी झाला नसता तर बरं झालं असतं. आपल्यासोबत एवढा मोठा धोका झाला. एवढी बेईमानी झाली. या भावनेतून वाटलं, चला दाखवून देऊ त्यांना, आणि तो शपथविधी झाला. पण आता तो विषय संपला, असंही फडणवीसांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

ममता बॅनर्जी आजपासून 3 दिवस मुंबई दाैऱ्यावर, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची घेणार भेट; चर्चांना उधाण

गिरीश महाजन म्हणाले, शिवसेनेसोबतचा आमचा 25 वर्षांचा संसार तोडला, आता जयंत पाटील म्हणतात…

राज्यातील निर्बंध वाढणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं विधान, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here