मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर आम्ही लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहोत, असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.
आपल्याला सर्वांना कल्पना आहे, गेल्या आठवड्यात मराठा आरक्षणाबद्दल सर्वाेच्च न्यायालयानं जो निकाल दिला, त्या निकालाच्या अनुषंगाने आज आजची आमची भेट होती. त्या निकालपत्रावरती आम्ही आमची प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं की, त्याच्यामध्ये जे सांगितलं गेलेलं आहे की, आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्याचा नसून केंद्राचा आहे. राष्ट्रपती महोदयांचा आहे. आणि साहजिकच आहे. आम्ही राष्ट्रपती महोदयांना आणि केंद्राला विनंती करण्यासाठी, आमच्या ज्या भावना आहेत. त्या पत्राच्या माध्यमातून तिथे पोहचवण्यासाठी आज राज्यपाल महोदयांची भेचट घेतली. ही भेट घेतल्यानंतर त्यांनी सुद्धा सांगितलं की, आपल्या भावना मी केंद्रापर्यंत मी नक्की पोहचवेन. आणि त्याच बरोबरीनं आम्ही हेही ठरवलेलं आहे, लवकरात लवकर आम्ही माननीय पंतप्रधानांची भेट घेऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, जसं आम्ही आज माननीय राज्यपालांना हे पत्र दिलं आहे, तसंच माननीय पंतप्रधानांची प्रत्यक्ष भेट घेवून ही विनंती त्यांना करू, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“उत्तर प्रदेशात रामराज्य आलं आणि सरकारने लोकांना रामभरोसे सोडून दिलं”
“ठाकरे सरकारचे दीड वर्ष फक्त अर्णब गोस्वामी, कंगना राणावत यांच्या सोबत 2 हात करण्यात गेले”
ठाकरे सरकराचा ‘मुंबई मॉडेल’ हा निव्वळ खोटारडेपणा- नितेश राणे
“अनिल देशमुखांवर ED ने दाखल केलेला गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे राजकारण”