मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगलंच यश मिळालं असून एनडीएची स्थापना होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही राजकीय घडामोडी होतील आणि राज्यातील सरकार पडेल, अशी विधानं काही भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष व इतर काही नेते गेल्या १ वर्षांपासून अशी विधाने करत आहेत. कारण सत्येशिवाय त्यांना राहता येत नाही. महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष पूर्ण करणार आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष व इतर काही नेते गेल्या १ वर्षांपासून अशी विधाने करत आहेत. कारण सत्येशिवाय त्यांना राहता येत नाही. महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष पूर्ण करणार आहे. (१/३)#महाविकासआघाडी#Mahavikasaghadi pic.twitter.com/NTCiHiW7fH
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 13, 2020
कारण आमचे सरकार हे एकजुटीने किमान समान कार्यक्रमावर काम करत आहे. तिन्ही पक्षाची विचारधारा वेगळी आहे पण कोणीही आपली विचारधारा सोडून सरकारमध्ये सामील झालेले नाही. जर आम्ही ठरवलं तर भाजप रिकामी होईल पण आम्हाला असे करायचे नाही., असंही नवाब मलिक म्हणाले.
कारण आमचे सरकार हे एकजुटीने किमान समान कार्यक्रमावर काम करत आहे. तिन्ही पक्षाची विचारधारा वेगळी आहे पण कोणीही आपली विचारधारा सोडून सरकारमध्ये सामील झालेले नाही.
जर आम्ही ठरवलं तर भाजप रिकामी होईल पण आम्हाला असे करायचे नाही. (२/३)#महाविकासआघाडी#Mahavikasaghadi— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 13, 2020
काही भाजप आमदारांची आमच्या पक्षात येण्याची इच्छा आहे. यामुळे एखादा ट्रेलर लवकरच रिलीज होईल., असं नवाब मलिक यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
काही भाजप आमदारांची आमच्या पक्षात येण्याची इच्छा आहे. यामुळे एखादा ट्रेलर लवकरच रिलीज होईल. (३/३)#महाविकासआघाडी#Mahavikasaghadi
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 13, 2020
महत्वाच्या घडामोडी-
किरीट सोमय्या हे शिखंडी आहेत, केवळ साडी नेसवणं बाकी- किशोरी पेडणेकर
अमृताताई, आपल्या नावातील ‘अ’ निघाले तर ‘मृता’ राहील; शिवसेनेचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर
“काँग्रेस नेते सचिन पायलट यांना कोरोनाची लागण”