मुंबई : भाजपाच्या शिष्टमंडळानं आज फोन टॅपिंग प्रकरणामध्ये राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान फोन टॅपिंग प्रकरणावरुन राज्यपालांनी हस्ताक्षेप करावा अशी मागणी भाजपाच्या शिष्टमंडळानं केली आहे.यानंतर विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसवर टीका केली. या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे.
आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो, असं म्हणत नाना पटोलेंनी भाजपाला टोला लगावलाय. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले बोलत होते.
“वाटा आणि घाटा हे फडणवीस सरकारमध्ये सर्व जनतेने पाहिलं आहे. आरएसएसला कसा वाटा पुरवला गेला होता, आरएसएसची लोकं कशी प्रत्येक मंत्रालयात होती, फडणवीसांच्या मंत्रालयात आरएसएसची किती लोकं होती याचा आकडा आम्ही सरकारला जाहीर करायला लावणार आहोत, असं नाना पटोले म्हणले.
मी मुख्यमंत्र्यांना भेटून या गोष्टींवर चर्चा करणार आहे. जे भ्रष्टाचारात गुंतले आहेत तेच आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो, काँग्रेसने देशाला उभं केलं,” असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“मुंबई इंडियन्सच्या ‘या’ स्टार खेळाडूच्या वडिलांचे निधन; सचिननं ट्विट करत वाहिली श्रद्धांजली
“आम्ही तोंड उघडलं तर भाजपा ची पळता भुई थोडी होईल”
भाई जगताप एक असा टपोरी आहे ज्याला ‘भाई‘ बनायचं होतं, पण डरपोक असल्यामुळे…; निलेश राणेंचा हल्लाबोल
“वाह अमृता फडणवीस वाह..! काय हा माज, गायकी पेक्षा मवालीगिरीत उत्तम करियर करू शकाल”