Home महाराष्ट्र आम्ही वैयक्तिक शत्रू नाही; फडणवीसांसोबत गुप्त बैठक नव्हती- संजय राऊत

आम्ही वैयक्तिक शत्रू नाही; फडणवीसांसोबत गुप्त बैठक नव्हती- संजय राऊत

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांची भेट घेतली आहे. या दोन नेत्यांमध्ये दोन तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील हयात हॉटेलमध्ये ही भेट झाल्याचं समजतं आहे. तसंच या भेटीचे विविध अर्थही काढले जात आहेत. यावर शिवसेना खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टी.व्ही. 9 शी बोलत होते.

आम्ही वैयक्तिक शत्रू नाही, फडणवीसांसोबत गुप्त बैठक नव्हती, तर सामनासाठी मुलाखत घेण्याबाबत चर्चा झाली. शिवसेनेत गुप्त बैठक करण्याची पद्धत नाही. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ती काही भूमिगत बैठक नव्हती. त्यांची आणि माझी बऱ्याच दिवसापासून भेट झाली नव्हती, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मला सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची प्रदीर्घ मुलाखत घ्यायची आहे. महाराष्ट्रातील प्रमुख साहित्यविषयक संस्थांचीही इच्छा आहे, की मी संपादक म्हणून फडणवीसांची जाहीर मुलाखत करावी. त्यासंदर्भात चर्चा केली, एकत्र जेवलो, अगदी गोपनीय पद्धतीने जेवलो, असंही संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

शुभमन गिलचे नाबाद अर्धशतक; कोलकाता नाईट रायडर्सचा सनराईझर्स हैदराबादवर दणदणीत विजय

दीपिका पादुकोणने दिली कबुली; म्हणाली…

बिहारमध्ये विकासाचे मुद्दे नव्हते म्हणून भाजपकडून सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचे राजकारण होत आहे- संजय राऊत

“अभिनेत्री सारा अली खानदेखील एनसीबीच्या झोनल कार्यालयात दाखल”