मुंबई : कोणाच्या म्हणण्यानं राज ठाकरे काही करतील, असे ते व्यक्ती नाहीत. राज ठाकरेंना त्या त्या वेळची राजकीय परिस्थिती समजते. कोणत्या ठिकाणी पोकळी निर्माण झाली आहे हेदेखील त्यांना समजतं आणि ती कशी ती भरून काढायची यासंदर्भात त्यांच्याकडे एक योजना असते, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
राज ठाकरे हे माझे चांगले मित्र आहेत आणि अनेकदा कोणालाही न सांगताही आमची भेट झाली आहे. त्यांच्यासोबत संवाद साधायलाही चांगलं वाटतं. अनेकदा त्यांनी माझ्यावर टीका केली, मीदेखील त्यांच्यावर टीका केली. एकमेकांची आम्ही उणीधुणीही काढली आहेत. परंतु त्यांच्याकडे एक विचार असतो. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची एक वेगळा दृष्टीकोन असतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ज्यावेळी ते हिंदुत्वाकडे येत आहेत हे माझ्या लक्षात आलं. त्यावेळी मी त्यांच्या मनात नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांची भेट घेतली. राज ठाकरेंसोबत जाण्याची अनेकदा इच्छा होती. परंतु त्या एका कारणामुळे आम्ही गेलो नाही. परप्रांतीयांनी मराठी माणसाच्या डोक्यावर बसावं असंही आमचं मत नाही. पण त्यांच्यासंदर्भातील टोकाची भूमिका आम्ही मान्य करू शकत नाही, असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.
महत्वाच्या घडामोडी-
टेस्टिंग वाढवा, कोरोना लढ्यासाठी महापालिकांना मदत करा; फडणवीसांचं राज्य सरकारला आवाहन
शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार; राज्य सरकारचा इशारा
अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करा; मराठा क्रांती ठोक मोर्चाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पुन्हा वेळ आणि शक्ती का वाया घालवायची? आदित्य ठाकरेंचा प्रकाश जावडेकरांना प्रश्न