मुंबई : राज्यात काही महिन्यावर स्थानिक पातळीवरील निवडणुका आल्या आहेत. सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र निवडणुक लढवणार की स्वबळाचा नारा देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना काही आदेश दिले आहेत. मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत बोलताना अजित पवारांनी आदेश दिले.
आपल्याला शिवसेनेबरोबर कायम रहायचं आहे. महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर स्थानिक पातळीवर खटके उडत आहेत. पण शिवसेनेबरोबर जुळवून घ्यायचं आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक पातळीवर जमवून घ्या, असे आदेश अजित पवारांनी आपल्या नेत्यांना दिले आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
उद्धव ठाकरे आपल्या देशाचा पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही- निलेश राणे
…अन्यथा तुर्कीसारखी परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही; रोहित पवारांचा केंद्र सरकारला इशारा
मुख्यमंत्री, कोरोना काय फक्त रात्री फिरतो का? नाईट कर्फ्युवरून मनसेचा शिवसेनेला टोला
सत्तेचा मटका अन् खत्रीचे आकडे; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा